अभिनेता संजय दत्त लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

0
530

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक सेलिब्रिटींना उतरवण्याची राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. प्रसिध्द  अभिनेता संजय दत्त  याची बहीण प्रिया दत्त मुंबईतून काँग्रेसकडून निवडणूक लढविणार आहे. तर दुसरीकडे संजय दत्त यांना उत्तर प्रदेशातून  निवडणूक रिंगणात उतरविण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

एका  संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.  संजय दत्तला  उमेदवारी  देण्यासाठी मायावतीचा बसपा व अखिलेश यादवचा सपा हे दोन्ही पक्ष उत्सुक असल्याचे सांगितले जात आहेत.  संजय दत्त  गाजियाबादमधून निवडणूक  लढवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सप आणि बसप यांची उत्तर प्रदेशात युती झाली आहे. त्यामुळे सपा किंवा बसपा या दोन्हीपैकी एका पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या दोन्ही पक्षांची युती झाल्याने संजयसाठी गाजियाबाद मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता आहे.