भाजपने सोलापुरातून उमेदवारी न दिल्यास राष्ट्रवादीत जाणार – खासदार शरद बनसोडे

0
421

सोलापूर ,  दि. १७ (पीसीबी) – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात माझा संपर्क आहे. माझा विजय होण्याची मला खात्री आहे. त्यामुळे पक्षाने मला पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी केली आहे.  

भाजपने मला उमेदवारी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा लढविणार आहे,  तत्पूर्वी मी राष्ट्रवादीत प्रवेश करेन, असा इशाराही  बनसोडे यांनी दिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे. पंतप्रधान मोदी  मला वैयक्तिक  ओळखतात, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना  पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.  बनसोडे यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा   शोध सुरू  केला आहे. त्यामुळे बनसोडे  अस्वस्थ झाले आहेत.