अपंग व मतिमंद १९ वर्षीय मुलीवर पाच नराधामांकडून बलात्कार

0
348

आरमोरी, दि.१७ (पीसीबी) – आरमोरी तालुक्यातील अपंग व मतिमंद १९ वर्षीय मुलीवर पाच नराधमांनी वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन एका वर्षांपासून बलात्कार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

देविदास मनीराम कुमरे (३५, रा. कुकडी, ता. आरमोरी),  दिगंबर विश्वनाथ दुर्गे (५२, रा. विहीरगाव, ता. आरमोरी), विजय गजानन कुमारे (२९, रा. कुकडी, ता. आरमोरी),  सुधाकर तुळशीराम कुमोटी (४५, रा. कुकडी, ता. आरमोरी), मेघशाम नामदेव पेंदाम (२४, रा. वडधा, ता. आरमोरी), असे या आरोपींची नावे आहेत.

आरमोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पीडितेवर मागील एक वर्षांपासून विकलांगतेचा फायदा घेऊन नराधमांनी वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन अत्याचार केला. या बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. या पाचही आरोपींनी वेगवेगळय़ा वेळेस पीडितेला एकटे गाठून चॉकलेट व पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळय़ा ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी दिली. मुलीला तिच्यासोबत नेमके काय होत आहे हे कळत नव्हते. दरम्यान, मतिमंद मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिल्याने घरच्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन यांनी मराठी वृत्तपत्रकाशी बोलताना दिली. आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पंकज बोडसे, केतन चव्हाण तपास करीत आहेत.