आर. आर. पाटलांसारखा माणूस राजकारणात दुर्मिळच – इंदुरीकर महाराज

0
349

सांगली,दि.१७(पीसीबी) – आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, आर. आर. पाटील राजकारणात आणखी २० वर्ष पाहिजे होते. त्यांच्यासारखा माणूस राजकारणात दुर्मिळच.

यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले, आबा राजकारणात असून खूप निराळे होते. ते राजकारण्यांसाठी आदर्श होते. गरिबीची त्यांना जाण होती. असा माणूस राजकारणात असणं, हे दुर्मिळच. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले, अशा भावना महाराजांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, आर. आर. आबा राजकारणात असूनही अतिशय साधे होते. त्यांनी कधी मोठेपणा मिरवला नाही. गरिबांच्या कामाला नेहमी त्यांनी प्राधान्य दिलं. असंही महाराजांनी यावेळी म्हणलं.