…अन् आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाचा वाऱ्याने उडालेला मंडप नीट झाला

0
964

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आदित्य यांच्या उपस्थित एका शाळेत  कार्यक्रमाचे आज (बुधवार) आयोजन करण्यात आले होते. यावेळी अचानक मंडप उडाल्याने एकच धावपळ उडाली. मात्र कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

एका शाळेत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.  यावेळी २ हजार विद्यार्थीनी आणि ५०० विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता.  दरम्यान, कार्यक्रम सुरू असताना अचानक हवेचा दाब वाढल्याने संपूर्ण मंडप उडाला. मात्र काही क्षणानंतर हा मंडप पुन्हा आहे, तसाच जागेवर आला. यावेळी मंडपाबरोबर मंडपचे चारही लोखंडी खांब उलटले होते.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे  विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच परिस्थिती  आटोक्यात आणली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार  घडला नाही, त्यामुळे आयोजकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पुन्हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर  आदित्य यांनी मीच जादूने हा मंडप वर नेऊन खाली आणल्याचे म्हणताच एकच हस्या पिकला.