अनोळखी व्यक्तीची माहिती तातडीने प्रशासनाला द्या सोलापूर शहर कोरोना मुक्त करा – आ.विजय देशमुख

0
436

 

सोलापूर, दि.२२ (पीसीबी) – सोलापूर शहरवासीयांनी आजपर्यंत अनेक मोठ्या संकटाला धीराने तोंड दिले आहे आणि प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात केली आहे. त्याचप्रमाणे कोरोना महामारी च्या विरोधातही सोलापूरकर एकदिलाने एकजुटीने लढताहेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा आणि घरी बसा, असे आवाहन सोलापूरचे आ. विजय देशमुख यांनी केले आहे.

ते म्हणाले की, सोलापूर शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील समस्त जनतेला कळकळीची विनंती आहे की, आपल्या गल्लीत,वस्तीत,सोसायटीत व आजूबाजूला कोणी नवीन व्यक्ती राहण्यास आला असेल तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्या आणि सोलापूर शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करा.

संपूर्ण देशात कोरणा या महामारीच्या आजाराने हाहाकाराने थैमान घातले आहे. देशांतही या महामारी विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने तीन मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. या महामारी विरोधात केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच प्रशासन मोठ्या ताकतीने आणि धैर्याने लढत आहे. आजवर सोलापूरला कोणताही पेशंट नसल्यामुळे सोलापूर शहराचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला होता परंतु अचानक १२ एप्रिल रोजी एका मृत व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल येतो आणि सोलापूर शहराला एक धक्काच बसतो यानंतर एका पाठोपाठ एक असे आजवर शहरात ३० च्या घरात कोरोना रुग्णांचा आकडा गेला आहे.

सोलापूर शहरात कोरणा चे पेशंट वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरात तीन दिवस शंभर टक्के संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचे समस्त सोलापूरकरांनी पालन करावे. प्रशासनाने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी केलेल्या सर्व सूचनांचे व आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर आपला परिसर, गल्ली,सोसायटी,नगरात आणि घराच्या आजूबाजूला कोणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देऊन सोलापूर शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे