पंतप्रधान मोदी २७ एप्रिल रोजी देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे साधणार संवाद

0
387

 

दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – देशातील कोरोनाबाबतचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील रणनिती ठरविण्यासाठी २७ एप्रिल रोजी देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या बैठकीत पुढील दिशा ठरणार असून लॉकडाऊन कालावधीवरही चर्चा होणार आहे. याबाबचे पत्र, पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, मोदींसोबतच्या या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्वच राज्यांचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य विभागाचे सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.

याआधीही पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या चर्चेअंती देशातील लॉकडाऊन कालावधी वाढवण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयानंतर भारतात ३ मेपर्यंतचे दुसरे लॉकडाऊन लागू झाले. कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले आहे.असे असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत. त्यामुळे काबूत येत असलेल्या या साथीला पुन्हा डोके वर काढायला जराही वाव मिळू नये यासाठी देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्यात असल्याचे मोदींनी जाहीर केले.