अजित पवारांच्या हाती भोपळा, सी व्होटर सर्वेक्षणातील अंदाज

0
112
  • महायुतीला मोठा फटका, शिंदेंच्या शिवसेनेला पाच, ठाकरेंना नऊ जागा

सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील संभाव्य चित्र समोर आलं आहे. या ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार भाजप-महायुतीचे मिशन ४५ प्लसचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता आहे. कारण भाजप-एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना एकत्रित केवळ ३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मिळून १८ जागा मिळण्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीला मात्र यंदाही खातं उघडण्यात अपयश येण्याची चिन्हं आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती सुप्रिया सुळे जिंकू शकतात, तर शिरूरची जागासुध्दा अमोल कोल्हे यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

भाजपला १८, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५, तर उमेदवार घोषित न झालेल्या सात ठिकाणी महायुतीला विजय मिळू शकतो. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता न येण्याची शक्यता आहे. उमेदवार घोषित न झालेल्या जागांपैकी नाशिक अजितदादा गटाला गेल्यास, केवळ त्या एका जागेवर त्यांना विजय मिळू शकतो. तर उर्वरित रत्नागिरी, पालघर, दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई अशा चार जागा भाजप आणि ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई अशा दोन जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाऊ शकते. अशा एकूण ३० जागा महायुतीच्या खात्यात पडू शकतात. संबंधित ओपिनियन पोल मार्चमध्ये घेण्यात आले असून त्यावेळी बहुतांश उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नव्हती. हे केवळ अंदाज असून निष्कर्ष किंवा निकाल नाहीत. त्यामुळे उमेदवारांची घोषणा आणि प्रत्यक्ष मतदानानंतर अनेक फॅक्टर बदलून निकालही फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीव्होटर आणि एबीपी ओपिनियन पोलचा विभागनिहाय अंदाज
विदर्भ
रामटेक – राजू पारवे (शिंदे-शिवसेना)- चुरशीची लढत
नागपूर – नितीन गडकरी (भाजप)- सोपा विजय
वर्धा – रामदास तडस (भाजप) – चुरस
अमरावती – नवनीत राणा (भाजप)- सोपा विजय
अकोला – अनुप धोत्रे (भाजप) – सोपा विजय
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (ठाकरे-शिवसेना) कांटे की टक्कर
भंडारा गोंदिया – सुनील मेंढे (भाजप) – कांटे की टक्कर
गडचिरोली चिमुर – नामदेव किरसान (काँग्रेस)- चुरशीची लढत
चंद्रपूर – सुधीर मुगंटीवार (भाजप) – कांटे की टक्कर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख (ठाकरे-शिवसेना) चुरशीची लढत

विदर्भ (१०)
भाजप – ०६
शिंदे-शिवसेना ०१
ठाकरे-शिवसेना ०२
काँग्रेस – ०१

विदर्भात भाजपचा वरचष्मा दिसण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह नवनीत राणा यांनाही विजय साकारता येण्याचे संकेत मिळत आहेत. रामटेकच्या जागेवर काँग्रेसमधील आयात उमेदवार असला, तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ती जागा (विदर्भातील एकमेव) टिकवण्यात यश येताना दिसत आहे. मात्र बुलढाण्याची जागा (विद्यमान खासदार) गमवावा लागू शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेला दोन, तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची चिन्हं आहेत.

मराठवाडा
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे-शिवसेना) चुरशीची लढत
नांदेड – वसंतराव चव्हाण (काँग्रेस) कांटे की टक्कर
परभणी – संजय जाधव (ठाकरे-शिवसेना) सोपा विजय
जालना – रावसाहेब दानवे (भाजप) सोपा विजय
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (ठाकरे-शिवसेना) कांटे की टक्कर
बीड – पंकजा मुंडे (भाजप) – चुरशीची लढत
धाराशिव – ओमराजे निंबाळकर (ठाकरे-शिवसेना) – सोपा विजय
लातूर – सुधाकर शृंगारे (भाजप)- सोपा विजय

मराठवाडा (०८)
भाजप – ०३
शिंदे-शिवसेना – ००
ठाकरे-शिवसेना ०४
काँग्रेस – ०१

मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा करिष्मा पाहायला मिळू शकतो. संजय जाधव, ओमराजे निंबाळकर या ठाकरेंसह असलेल्या विद्यमान खासदारांना सीट टिकवता येणार आहेच, याशिवाय संभाजीनगर, हिंगोलीची जागाही खेचून आणता येण्याची चिन्हं आहेत. मराठा आरक्षणाचा प्रभाव राहिलेल्या जालन्यात भाजपच्या रावसाहेब दानवेंना यश मिळण्याची शक्यता आहे. तर पंकजा मुंडेंच्या खासदारकीचं स्वप्नही प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश करुनही नांदेडमध्ये पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसला (मराठवाड्यातील एकमेव) जागा मिळवता येण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार – गोवाल पाडवी (काँग्रेस) – कांटे की टक्कर
धुळे – सुभाष भामरे (भाजप) – कांटे की टक्कर
जळगाव – स्मिता वाघ (भाजप) – सोपा विजय
रावेर – रक्षा खडसे (भाजप) – सोपा विजय
दिंडोरी – भरती पवार (भाजप)
नाशिक – महायुती (उमेदवार घोषित नाही)
अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार राष्ट्रवादी)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे-शिवसेना)

उत्तर महाराष्ट्र (०८)
भाजप – ०४
शिंदे-शिवसेना/अजित पवार-राष्ट्रवादी (महायुती) – ०१
ठाकरे-शिवसेना ०१
शरद पवार-राष्ट्रवादी – ०१
काँग्रेस – ०१

जळगाव आणि रावेरमध्ये भाजपचं कमळ पुन्हा फुलण्याची चिन्हं आहेत. नाशिकमध्ये उमेदवार घोषित नसला, तरी महायुतीच्या पारड्यात विजय पडण्याची शक्यता आहे. नगरमध्ये मात्र भाजपला धक्का बसून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके विजयी होण्याचे संकेत आहेत. तर शिर्डीतही ठाकरेंची शिवसेना मैदान मारण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र
पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) – सोपा विजय
बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार राष्ट्रवादी) चुरशीची लढत
शिरूर – अमोल कोल्हे (शरद पवार राष्ट्रवादी) सोपा विजय
मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे-शिवसेना) – सोपा विजय
सोलापूर – राम सातपुते (भाजप) – कांटे की टक्कर
माढा – धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार राष्ट्रवादी)- सोपा विजय
सांगली – संजयकाका पाटील (भाजप) – कांटे की टक्कर
सातारा – शशिकांत शिंदे (शरद पवार राष्ट्रवादी) – कांटे की टक्कर
कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे-शिवसेना) – चुरशीची लढत
हातकणंगले – सत्यजित पाटील (ठाकरे-शिवसेना) – चुरशीची लढत

पश्चिम महाराष्ट्र (१०)
भाजप – ०३
शिंदे-शिवसेना – ०२
शरद पवार-राष्ट्रवादी – ०४
ठाकरे-शिवसेना – ०१

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वर्चस्व राखण्यात यश येण्याची चिन्हं आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा येण्याची शक्यता नाही. बारामती, शिरुरमध्ये शरद पवारांची किमया पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंना पराभवाचा धक्का बसू शकतो. तर माढ्यातही भाजपचं टेन्शन वाढून मोहिते पाटील सीट काढण्याचा अंदाज आहे. पुणे, सोलापूर, सांगली या बहुचर्चित जागा राखण्यात भाजपला यश मिळू शकतं. कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेला यश येऊन शाहू महाराज छत्रपतींना पराभूत व्हावं लागू शकतं. तर हातकणंगलेत राजू शेट्टींना धक्का बसून ठाकरेंची शिवसेना विजयश्री प्राप्त करण्याचा अंदाज आहे.
मुंबई-कोकण
पालघर – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय
भिवंडी – सुरेश बाळ्यामामा म्हात्रे (शरद पवार राष्ट्रवादी) – चुरशीची लढत
कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे-शिवसेना) – सोपा विजय
ठाणे – महायुती (उमेदवार घोषित नाही) – चुरशीची लढत
उत्तर मुंबई – पियूष गोयल (भाजप) – सोपा विजय
उत्तर पश्चिम मुंबई – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – मिहिर कोटेचा (भाजप) – कांटे की टक्कर
उत्तर मध्य मुंबई – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय
दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिंदे-शिवसेना) – सोपा विजय
दक्षिण मुंबई – महायुती (उमेदवार घोषित नाही)- कांटे की टक्कर
रायगड – अनंत गीते (ठाकरे-शिवसेना) – चुरशीची लढत
रत्नागिरी सिंधुदुर्ग – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय

मुंबई-कोकण (१२)
भाजप – ०२
शिंदे-शिवसेना – ०२
महायुती (उमेदवार घोषित नाही) – ०६
शरद पवार-राष्ट्रवादी – ०१
ठाकरे-शिवसेना – ०१

मुंबई-कोकण पट्ट्यातील बहुचर्चित जागांवर महायुतीचा वरचष्मा राहण्याचे संकेत आहेत. महायुतीच्या पारड्यात मुंबईतील सहाही जागा पडू शकतात. यासह ठाणे, कल्याण, पालघर, रत्नागिरी या जागांवर यश येऊ शकतं. म्हणजेच ठाकरेंना दक्षिण मुंबई आणि रत्नागिरी या दोन विद्यमान जागा गमवाव्या लागू शकतात. मात्र रायगडच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पराभवाची धूळ चारुन ठाकरेंचे अनंत गिते विजय मिळवू शकतात. तर भिवंडीत शरद पवारांची राष्ट्रवादी विजय मिळवू शकते.

एकूण – ४८
भाजप – १८
शिंदे-शिवसेना – ०५
अजित पवार-राष्ट्रवादी – ००
महायुती (उमेदवार घोषित नाही) – ०७
महायुती – एकूण ३०

ठाकरे-शिवसेना – ०९
शरद पवार-राष्ट्रवादी – ०६
काँग्रेस – ०३
महाविकास आघाडी – एकूण १८