अजित पवारनंतर धनंजय मुंडेंची जीभ घसरली; गिरीश महाजनांना म्हणाले पिस्तुल्या

0
808

बीड, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये एकमेंकावर खालच्या पातळीवर टीका करण्याचे सत्र कायम आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीदेखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना जीभ घसरली.    

राष्ट्रवादीच्या वतीने परळीत  उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. परळी येथील शेतकरी मोर्चाला संबोधित करताना धनंजय मुंडे  यांनी एकेरी उल्लेख करत गिरीश महाजन यांच्यावर  घसरले. धनंजय मुंडे म्हणाले,  प्रेमाने आपण त्यांना पिस्तूलराव म्हणतो, तर काहीजण लाडाने पिस्तुल्या म्हणतात, असे म्हणत महाजनांवर त्यांनी  टीका केली.

दरम्यान, अजित पवार यांनी गिरीश महाजनांवर टीका करताना त्यांना नाच्या असे म्हटले होते. या टीकेला भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर पोस्टरबाजी करत उत्तर दिले होते. अजित पवार मुतऱ्या तोंडाचा, अशा आशयाचा मजकूर पोस्टरवर लिहीला होता.