मुख्यमंत्र्याच्या खासदार पत्नीला २३ लाखांचा गंडा

0
376

पंजाब, दि. ८ (पीसीबी) – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी खासदार कौर यांना एका ठगाने बँक अधिकारी असल्याचे फोनव्दारे सांगून तब्बल २३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला.  

कौर या दिल्ली येथे लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याकरिता जात होत्या. त्यामुळे त्या घाईत असताना मॅनेजरचा फोन असल्याचे समजून त्यांनी आपली सर्व माहिती कॉल करणाऱ्या ठगाला दिली. त्यानंतर काहीच वेळात त्यांना त्यांच्या बॅंक अकाऊंट मधून २३ लाख रुपयांची चोरी झाल्याचा मॅसेज आला. कौर यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी एका संशयीताला रांची येथून अटक केली आहे.