अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती गंभीर; लंडनच्या रुग्णालयात घेत आहेत उपचार

0
522

हैद्राबाद, दि. ११ (पीसीबी) – एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती बिघडली असून सध्या गंभीर आहे. लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडली असल्याची माहिती आहे.

अकबरुद्दीन ओवेसी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. २०११ रोजी एका घटनेत त्यांना गोळी लागली होती तसेच चाकूने जखमी झाले होते. यासाठीच लंडनमध्ये ते उपचार करुन घेत आहेत. तीन दिवसांपुर्वी अकबरुद्दीन यांना उलट्यांचा त्रास होऊन पोटात दुखत होते. यामुळे त्यांना तातडीने लंडनमधील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.