‘घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध करुन देत आहोत’ – चंद्रकांत पाटील

0
604

मुंबई, दि. १० (पीसीबी) – सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे.

याविषयी बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘उत्तम व्यवस्था उभा करणे हे सर्वात मोठे चॅलेंज प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर आहे. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी हे चॅलेंज स्विकारले आहे. घरी होणार नाही, इतकी चांगली व्यवस्था उपलब्ध आपण करुन देत आहोत’, अस विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.