पूरग्रस्त जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती – उध्दव ठाकरे

0
390

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे मी या भागाचा दौरा केला नाही’, असं स्पष्टीकरण दिले. तसेच पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे काम सुरु आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.