जयंत पाटील यांना घेऊन जाणारी बोट प्रवाहात भरकटली    

0
522

सांगली, दि. ११ (पीसीबी) – पुरग्रस्तांना मदत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बोट मध्येच बंद पडून मोठ्या प्रवाहात वाहत गेली. मात्र बोट चालकाने प्रसंगावधान दाखवत  एका झाडाला बोट दोराने बांधून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.  यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

सांगलीवाडी येथील पूरग्रस्तांना लक्ष्मी फाट्यावर  काढण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. वाळवा व मिरज तालुक्यातील कृष्णा, वारणा नदीकाठच्या पूरग्रस्तांना  सुरक्षितस्थळी हलविण्याच्या बचावकार्यात पाटील व्यस्त आहेत. पुरग्रस्तांची  राहण्याची,  जेवणाची व्यवस्था करणे,  पुरग्रस्तांची  जनावरे बांधण्याची, वैरणीची व्यवस्था करण्याची सुचना पाटील देत आहे.

सांगलवाडी येथील माजी सभापती हरिदास पाटील यांनी वाडी मध्ये हजारो पूरग्रस्त अडकले असून त्यांना बाहेर काढणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल,असा  पाटील यांना फोन आला. पाटील यांनी एनडीआरएफशी संपर्क करून ४-५ बोटींची व्यवस्था केली. तसेच करखान्यावरून लोकांचे जेवण घेवून  लक्ष्मी फाटा येथे पोहचले.  परंतु यावेळी त्यांची बोट मध्येच बंद पडली.