‘मायलेकांची गुलामीच करणार का, आयुष्यभर भर’; भाजप नेत्यांचे वक्तव्य

0
450

दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसने घेतलेल्या निर्णयानंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून गांधी कुटुंबीयांनी निशाणा साधला . काँग्रेस नेते आयुष्यभर या ‘मायलेकांची गुलामीच’ करत राहणार अशी अप्रत्यक्ष टीका करणारा व्हिडिओ मालवीय यांनी पोस्ट केला आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तसेच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही स्पष्ट केले होते . मात्र तसे काहीच झाले नाही . राहुल गांधी यांनी ३ जुलै २०१९ रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी पक्षाध्यक्षपद नाकारले. त्यानंतर तीन महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होते. शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत सर्वमताने सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली आहे.