श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर

0
295

वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मावळ (पीसीबी) । मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या 20 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 16 फेब्रुवारी रोजी पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. अमित गोरखे यांना शिक्षण रत्न, मुकुंद कुचेकर यांना समाजभूषण, डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांना कला गौरव, सुर्यकांत मूथियान -पर्यावरण भूषण, वसंत काटे- उद्योगरत्न, माया रणवरे- दुर्गारत्न, डॉ. नारायण सुरवसे- सेवाभूषण, प्रा. सुनिता नवले-दुर्गारत्न, विजयन -शिक्षणरत्न, शेखर कुटे-वारकरी भूषण, संगीता तरडे-दुर्गारत्न, अमरसिंह निकम-आरोग्य भूषण, वृशाली मरळ- आधारभूषण, संतोष कनसे-श्रमिक भूषण, आलम शेख, भगवान मुळे -समाजभूषण, जयदेव म्हमाणे -क्रीडारत्न, प्रमोद शिवतरे -समाजभूषण, अनिल साळुंखे-समाजरत्न आणि शुंभकर को-हौसिंग सोसायटीला आदर्श भूषण सोसायटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

खासदार बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त  विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांच्यावतीने एकविरा क्रिकेट क्लब भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा 8 फेब्रुवारीपासून घेण्यात येत आहे. 15 फेब्रुवारीला दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन होणार आहे. युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, शहरप्रमुख निलेश तरस, महिला संघटिका सरिता साने यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे.  15, 16 फेब्रुवारी रोजी उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी यांच्या माध्यमातून मळवलीला भव्य बैलगाडा छकडी स्पर्धा होणार आहे. 15 फेब्रुवारीला तळेगावदाभाडे येथील जनसेवा विकास समिती, शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे.

खासदार बारणे यांचा 16 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यादिवशी सकाळी श्री मोरया गोसावी मंदिराच श्रींचा अभिषेक होणार आहे. सायंकाळी रामकृष्ण मोरे सभागृहात विविध मान्यवरांचा गौरव व अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. त्याचबरोबर सरिता साने, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने मोफत फिजीयोथेरपी शिबिर होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र श्री 2023 राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा विजयनगर काळेवाडी येथे होणार आहे.  सुनील पाथरमल यांनी स्पर्धेचे नियोजन केले आहे. 21 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी, रोगनिदान शस्त्रक्रिया शिबिर, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, लहान मुलांची मोफत हृदयशस्त्रक्रिया  कार्ला येथे होणार आहे. युवा सेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे.