स्वच्छतेची सवय विद्यार्थी दशेतच असावी – आयुक्त हर्डीकर

0
506

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डीच्या एनएसएस व रोट्रॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजचा परिसर व आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या परिसरात येथे १५० वी गांधी जयंती साजरी केली.

या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा संकलन केले व प्लास्टिक बंदी बाबत रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती केली. तसेच स्टेशनवरील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हर्डीकर म्हणाले कि, “स्वच्छतेची सवय विद्यार्थी दशेतच लावली पाहिजेत.” विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे आयुक्तांनी कौतुक करीत नागरिकांना हर्डीकर यांनी ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गीकरण करावे व प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून आवाहन केले.

कार्यक्रमास प्रा. रोहित शिंदे, प्रा. मयूर शिंदे व सिव्हिल इंजिनिअर विभाग प्रमूख प्रा. अमृता कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. मिनाज अल्वी यांनी आयोजन केले. प्राचार्या डॉ. ए. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन आमदार सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक (नि) कर्नल एस के जोशी, प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, कुलसचिव वाय के पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. आकुर्डी स्टेशन प्रबंधक रजत रतन यांनी आभार मानले.