‘माँ भगवती कि भव्य चौकी’ संगीतमय कार्यक्रमात भक्त न्हाऊन निघाले भक्ती रसात

0
502

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – वाल्हेकरवाडीत “मॉ भगवती कि भव्य चौकी” या संगीतमय कार्यक्रमात भक्त भक्ती रसात न्हाऊन निघाले. तूने मुझे बुलाया शेरावालीए, माताने बुलाया शेरावालीए.. मैं तो आरती उतारु रे संतोषी माता कि…, राधे..राधेय,  अशा गाजलेली देवीची गाणी सादर करण्यात आली. उत्साही पुरुष व महिला भक्तांनी गाण्यावर भक्तांनी ठेका धरला.

अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे भक्ती गीता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी आमदार अण्णा बनसोडे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, नरेश मित्तल, अग्रसेन ट्रस्ट के अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, कार्याध्यक्ष  प्रेमचंद मित्तल, मदन अग्रवाल, रामशरण अग्रवाल, रमेश अग्रवाल, जगदीशप्रसाद सिंघल, सीए के. एल बंसल, देवीचंद आगरवाल, रामअवतार आगरवाल आदी उपस्थित होते.

गायक नरेश सैनी,रमेश ऑबेराय, अंजली सागर, मुकेश गोयल यांनी सादर केलेल्या देवीच्या भक्तिगीतांना भक्तांनी टाळ्यांची दाद दिली. यावेळी कलाकारांनी भोलानाथच्या व चंडिकादेवीची वेषभूषा करून सादर केलेल्या नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

कार्यक्रमाचे नियोजनासाठी निरंजन आगरवाल, सुनील अग्रवाल, जोगिन्दर मित्तल, सतपाल मित्तल, वेद मित्तल, अनिल अग्रवाल, विनोद मित्तल, कार्यकारिणी सदस्य विनोद बंसल, पवन गोयल, विजय मित्तल, मुकेश मित्तल, अनिल रामगोपाल अग्रवाल, रोहित अग्रवाल, जितू कनोडिया यांनी विशेष परिश्रम घेतले. विश्रांतवाडीच्या खाना बचाओ समितिचे राजेश पि अग्रवाल, मोहन अग्रवाल यांनी अन्नदान केले.