माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा काढली

0
411

दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना सीआरपीएफचे सुरक्षाकवच असेल. सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर मनमोहन सिंह यांना ‘एसपीजी’ऐवजी ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला गेला आहे. ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात. ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणे किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो,” असे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.