पत्नीशी अश्लील बोलल्याच्या कारणावरून मित्राची अपहरण करून हत्या

0
699

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – पत्नीशी अश्लील भाषेत बोलल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचे अपहरण करून हत्या केली. पुण्यातील संगमवाडी येथे तरूणाचा मृतदेह  आढळून आला. या प्रकरणी आरोपी आकाश साळवे (वय २५) आणि इलियाज शेख (वय २१) यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

रोहित किसन कांबळे (वय १९) असे हत्या केलेल्या तरूणाचे  नाव आहे.  हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुण्यातील संगमवाडी येथील नदीत आरोपींनी फेकून दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित किसन कांबळे याचे गुरुवारी अपहरण झाल्यानंतर  रोहितच्या आईने वाकड पोलिसांत फिर्याद दिली होती.   वाकड पोलीस रोहितचा शोध घेत असताना आज (रविवार) पुण्यातील संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह मिळाला.

मयत रोहित, आरोपी आकाश आणि इलियाज हे तिघे मित्र आहेत. वाकड ते काळेवाडी फाटा येथे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात.  मयत रोहित हा आकाशच्या पत्नीला अश्लील बोलला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद ही झाला होता.  या कारणातून त्याने मित्र इलियाजच्या साथीने रोहितला गुरुवारी त्याच्याच रिक्षातून लोणावळा येथे फिरण्यासाठी जाऊ असे म्हणून दोघांनी तळेगाव परिसरातील भेगडेवाडी येथे नेण्यात आले. तिथे  आकाशने साथीदार इलियाजच्या मदतीने रोहितचा गळा आवळून खून केला.

अधिक तपास वाकड पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने  करत आहेत.