महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास – शिवाजीराव आढळराव पाटील

946

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे मागील पाच भोसरी परिसरात अनेक समाजोपयोगी विकासप्रकल्प विकसित करण्यात आले. त्यांचा भोसरी व्हिजन २०-२० हा संकल्प शहराला आणखी वेगाने विकसित करणारा ठरेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

माजी खासदार आढळराव म्हणाले की, उद्योग व्यवसायासाठी देशभरातून कामगार पिंपरी चिंचवडला स्थायीक होण्यासाठी येतात. त्यामुळे शहराचा नागरीकरणामध्ये देशात पहिल्या पाच मध्ये क्रमांक आहे. वाढत्या नागरीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा भोसरी व्हिजन 20-20 हा संकल्प शहराला निश्चितच लाभदायी ठरेल.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरीच्या विकासाचे स्वप्न पाहत हाती घेतलेला इंद्रायणी सुधार प्रकल्प, नाशिक फाटा ते चाकण, पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प, मल्टिमोडल हब, वेस्ट टू एनर्जी, देहू आळंदी पुणे पालखी महामार्ग, संविधानभवन, संतपीठ, सफारीपार्क, भक्ती-शक्ती चौकातील तीनमजली उड्डाणपूल, स्पोर्ट्‌स सिटीच्या दृष्टीने इंद्रायणीनगर, गवळीनगर, भोसरी  गावजत्रा मैदान, मोशी चिखली प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी येथे विकसित केलेले क्रीडा प्रकल्प, सफारी पार्क, नामांकित  शिक्षण संस्थांसाठी प्राधिकरण परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची धडपड. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व स्मार्ट सिटीच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. तसेच विकासाचे मॉडेल म्हणून च-होली गावचा कायापालट होणार आहे. आरोग्य सुविधेसाठी उभारण्यात आलेले नूतन भोसरी रुग्णालय, भोसरी परिसराचा ग्रीन बेल्ट विकसित करण्यासाठी ग्रीन भोसरी क्लिन भोसरी प्रकल्प आणि उद्याने व क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधा. आंद्रा-भामा-आसखेड पाणी पुरवठा योजना अशा अनेक योजनांची आठवण माजी खासदार आढळराव पाटील यांनी करून दिली.

इंद्रायणी थडीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकण्यात आलेले पाऊल महत्वाचे व ऐतिहासिक आहे. त्याबरोबरच नागरिकांचे दैनंदिन प्रश्न हातावेगळे करण्यासाठी राबविण्यात आलेल्या परिवर्तन हेल्पलाईनच्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अल्पावधीत होत आहे. विकासाचे ध्येय बाळगणा-या या युवा नेतृत्वास पुन्हा भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार आढळराव-पाटील यांनी केले.