CCTV: बुडत्या गाडीमधून चालकाने बाळाला फेकले अन्…

0
559

ओरिचा, दि.१ (पीसीबी) – एका अरुंद पुलावरुन येणाऱ्या रिक्षाला होणारी धडक चुकवण्याच्या नादात एका कार अरुंद पुलावरुन पाण्यात पडली. हा अपघात. सोमवारी (२८ ऑक्टोबर) रोजी राज्यातील निवारी जिल्ह्यामधील ओरिचा येथे घडला. हा धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अरुंद पुलावरुन एक रिक्षा भरधाव वेगाने जात असतानाच समोरुन एक कार आली. या रिक्षाला धडक बसू नये म्हणून गाडी डावीकडे घेण्याचा चालकाने प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये गाडी थेट नदीमध्ये कोसळली. गाडीमध्ये एक लहान मुलही होते. गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत बुडणाऱ्या गाडीच्या डाव्या बाजूच्या दारावर चढून लहान मुलाला बाहेर काढले. पुलापासून काही अंतरावर गाडी बुडू लागली. त्यावेळी या चालकाने आपल्या हातातील बाळाला पुलाकडे भिरकावले. पुलावरील लोकांना त्या बाळाला पकडता आले नाही आणि ते बाळ पाण्यात पाडले. मात्र लगेच एका व्यक्तीने पाण्यात उडी मारुन बाळाला वर काढले. इतरांनी पुलावरुन एक कापड खाली टाकत या बाळाला वर घेतले. दरम्यान इतरांनी गाडीतील उर्वरित चार जणांना वाचवले. गाडीतील सर्वजण सुखरुप असून त्यांना किरोळ जखम झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातानंतर इतरांच्या मदतीने गाडीतील पाचही जणांचे प्राण वाचले असले तरी अपघातासाठी कारणीभूत असणाऱ्या रिक्षाचालकाने पाण्यात पडलेल्या गाडीमधील प्रवाशांना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला.