२१ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा अटक

0
561

मुंबई, दि.१ (पीसीबी) – लग्नाच्या करण्याच्या बहाण्याने २१ वर्षीय तरूणीवर बलात्कार १५ वर्षीय मुलाला अटक करण्यात करण्यात आली आहे.

पीडीतेच्या तक्रारीनुसार, मुंबईतील एका हॉटेलमध्ये या मुलाने मला डांबले होते आणि माझे लैंगिक शोषण केले तसेच माझ्यावर बलात्कार केला असे पीडित मुलीने सांगितले आहे. याबाबत अधिक तपास केला असता हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि पंधरा दिवसांपूर्वी पळून गेले होते अशी माहिती समोर आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २१ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका १५ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे मांडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आम्ही मुलीच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. या मुलाची रवानगी तोपर्यंत बालसुधारगृहात करण्यात आली आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे.