पिंपरी-चिंचवड ‘मोटार ड्रायव्हिंग स्कूल’ प्रश्नांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसोबत मीटिंगमध्ये चर्चा

0
298

पिंपरी, दि.३१ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल कामकाजामध्ये येणाऱ्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली नवीन वर्षामध्ये सदर कार्यालयातील लायसन्स विषयक कामकाज गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील व जास्तीत जास्त उमेदवारांना शिकाऊ व पक्के लायसन देण्याचा प्रयत्न कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

मीटिंगमध्ये उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आले व कामात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागामध्ये नागरिकांना आरटीओ कामकाजाची माहिती देण्यासाठी प्रत्येक विभागात एका कर्मचाऱ्याचे नेमणूक करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला अल्ट्रा मॉडेल ड्रायव्हिंग टेस्ट मुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय परीक्षा होत असल्यामुळे उमेदवारांची स्किल चाचणी घेण्यात येत आहे त्यामुळे मोटार ड्रायव्हिंग शिकवण्याची फी 7500 ते 8500 होणार आहे त्यामुळे असे उत्तम व गुणवत्तायुक्त वाहनचालक निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन कटिबद्ध आहे व रस्ता सुरक्षा इंधन बचत नो हॉर्न ओके प्लिज व ट्रेन द ट्रेनर चे विविध उपक्रम राज्य असोसिएशन वतीने राज्यातील 51 आरटीओमध्ये राबविण्यात येणार असे प्रतिपादन राजू घाटोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांनी केले सदर मिटिंग मध्ये अजय आ दे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड मनोज ओतारी सहाय्यक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड अजय अवताडे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड राज्याचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार, खजिनदार निलेश गांगुर्डे, अक्षय काळे, पिंपरी-चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार, न्यू पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे अध्यक्ष स्वप्निल पवार, अरविंद इंदलकर, बापूसाहेब देशमुख, विजयसिंह परदेशी, मारुती वानखेडे, दिनेश टटू, संतोष आपोळकर आदी मान्यवर उपस्थित होते