बजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य

0
671

जकार्ता, दि. २० (पीसीबी) – पहिलवान बजरंग पुनिया याने आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करत १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ६५ किलो वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारात बजरंगने अंतिम लढतीत जपानच्या दाइची ताकातानीचा ११-८ अशा फरकाने पराभव केला. बजरंगचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आहे. बजरंगने चार वर्षांपूर्वी इंचियोन आशियाई स्पर्धेत ६१ किलो वजनगटात रौप्य पटकावले होते. दरम्यान, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफल मिक्स्ड प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे.

बजरंगने या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी म्हटले होते की, ‘माझे गुरू योगेश्वर यांनी २८ वर्षांनंतर देशाला कुस्तीचे सुवर्णपदक मिळवून दिले होते. मी पण आता फार वाट पाहायला लावणार नाही.’