पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

0
1087

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थेतील बदल पुढील प्रमाणे,पिंपरी मेन बाजार मध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक १९ मधील पिंपरी कॅम्प बाजारपेठेत भाटनगर कॉर्नर ते शगुन चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहनांना सम आणि विषम तारखांना पार्किंग करण्यात आले आहे. रेंटेड क्वार्टर्स ए ६ च्या बाजूला ३ फूट रुंद आणि ३० मीटर लांब पर्यंत दुचाकी पार्किंग, रेंटेड क्वार्टर्स ए ७ च्या बाजूला ३० मीटर लांब पर्यंत दुचाकी पार्किंग करण्यात आली आहे. तसेच रेंटेड क्वार्टर्स ए ७ ते ए १२ आणि १३ ते ए १६ च्या गल्लीमध्ये नो पार्किंग करण्यात आली आहे. पिंपरी एमजी रोडवर भाटनगर कॉर्नर कडून शगुन चौकाकडे येण्यास दुचाकी वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.