लग्नात हळदीच्या दिवशी झालेल्या वादाच्या कारणावरून विवाहितेचा छळ

0
416

पिंपरी, दि. 28 (पीसीबी): लग्नात हळदीच्या दिवशी झालेल्या वादाच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार मे 2019 पासून 19 जून 2020 या कालावधीत घडला आहे.

पती सत्यजित प्रवीण मांडगे, दीर सत्यादीप प्रवीण मांडगे, सरोज प्रवीण मांडगे, सासरे प्रवीण गजन्नाथ मांडगे (सर्व रा. वनदेवनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहितेच्या लग्नात हळदीच्या दिवशी सासर आणि माहेरच्या लोकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या रागातून तसेच नोकरी करू नको असा तगादा लावत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.