अभिनेता सुशांत सिंह रापूतची गळफास घेऊन आत्महत्या

0
674

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – हिंदी चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूत (वय३५) याने आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वांद्र्यातील राहत्या घरातच त्याने गळफास घेतला. महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधआरीत चित्रपटात त्याने धोनीची भुमिका केली. त्याच्या मॅनेजरने नुकतीच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचाही मोठा धक्का त्याला बसला होता. त्याच्याकडे असलेले चित्रपट पाहता आत्महत्येमागे करीअर संबंध नसावा, असे सांगण्यात आले.

सुशांत सारखा तरुण तडफदार अभिनेत्याने आत्महत्या केली हे खुपच धक्कादाक असल्याची चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची प्रतिक्रीया आहे. टेलिव्हिजन मधून पवित्र रिश्ता सारख्या मालिकेतून तो चित्रपटात आला. काय पो छे, एम एस धोनी, छिछोरे, केदारनाथ अशा गाजलेल्या चित्रपटांतून त्याने भूमिका केल्या. विशेष म्हणजे छिछोरे या चित्रपटात एका आत्महत्या करू पाहणाऱ्या मुलाच्या वडिलांची भूमिका केली होती. दिल बेचारा या नव्या चित्रपटाची शुटिंग सुरू होती. बिहार मधून आलेल्या या अभिनेत्याचे चित्रपट हिट ठरत होते. खुप संवेदनशील, हुशार, डेडिकेटेड असा अभिनेता होता, असे त्याच्या बरोबर काम केलेले अभिनेते सांगतात.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.