काळेवाडीतील भुमिपुत्रांनी पंचनाथ उत्सवानिमित्त भरविलेल्या निकाली कुस्त्यांच्या मैदानात एक लाख रुपयांपेक्षाही जास्त रोख रकमेची बक्षिसे वाटण्यात आली. रणहलगी कडाडली आणि पैलवानांचे रक्त सळसळले. रोख एक्कावन्न हजारांच्या इनामासाठी शेवटची कुस्ती कुंजीर तालमीचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. प्रमोद मांडेकर आणि सह्याद्री कुस्ती संकुलचा राष्ट्रीय पदक विजेता पै. संग्राम शिंदे यांच्यात २२ मिनिटांहुन जास्त वेळ झुंज झाली. हजारों कुस्ती शौकीनांचे डोळ्यांचे पारणे फेडणारी ही झुंज शेवटी बरोबरीत सुटली. समस्त गावकरी मंडळींच्या वतीने दोघांनाही विभागून रोख बक्षीस देण्यात आले. पवना नगर रोड भोईर मळा काळेवाडी, पिंपरी येथे झालेल्या कुस्त्यांचा मैदानात यावेळी तेजश्री सोनवणे, श्रेया कंधारे, अजय लांडगे, किशोर नखाते या नामांकित खेळाडूंचा देखील पंचनाथ उत्सव कमिटी आणि समस्त गावकरी मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला.

निकाल पुढील प्रमाणे : कुमारी अक्षदा वाळुंजकर वि.वि. कुमारी सोनाली कोळी तसेच पै. विनोद शिंदे विजयी विरुध्द पै. राहुल वाघमारे; पै. अभिषेक तुर्केवाडकर वि.वि. पै. संकेत घाडगे; पै. ऋषिकेश बालवाडकर वि.वि.पै. केतन खराडे; पै. प्रविण निबांळकर वि.वि.पै. युवराज दांगट; पै. सुशांत फेंगसे वि.वि.पै. निखील नलावडे; पै. समाधान दगडे वि.वि.पै. निखिल उंद्रे; पै. सागर लोखंडे वि.वि.पै. शाम केंद्रे; पै. शिवराज मदने वि.वि.पै. विराज रानवडे; पै. विशाल वाळुंज वि.वि.पै. रोहित कलापुरे; पै. सत्यम भोईर वि.वि.पै. विशाल थोरवे; पै. वरुण कांचन वि.वि.पै. शुभम जाधव; पै. तुषार पवार वि.वि.पै. वैभव बारणे; पै. अविनाश माने वि.वि.पै. रामदास दळवी; पै.अंजिक्य कुदळे वि.वि.पै. महेश येळवंडे; पै.सनी केदारी वि.वि.पै. सोनू यादव; पै. ओंकार जाधव वि.वि.पै. विशाल सोंडकर; पै. धनराज बिचकुले वि.वि.पै. गईनाथ शिर्के; पै. निरंजन बालवडकर वि.वि.पै. गोविंद जाधव; पै. अंजिक्य माचुत्रे वि.वि.पै. श्रेयस लाटकर; पै. किरण माने वि.वि.पै. अर्जुन बानगुडे; पै. बाबू पिसाळ वि.वि.पै. संकेत माने; पै. श्री जाधव वि.वि.पै. शार्दुल गायकवाड