अविश्वास प्रस्तावावर मतदान न करण्याचा शिवसेनेचा निर्णय; मोदी सरकारला धक्का

0
502

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – मोदी सरकारच्या विरोधात संसदेत आज (शुक्रवार) मांडण्यात येणाऱ्या  अविश्वास प्रस्तावावर मतदान न करण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. मतदानाच्या वेळी लोकसभेत गैरहजर राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मोदी सरकारला हा मोठा धक्का   मानला जात आहे.

सत्तेत सहभागी असणारी शिवसेना संसदेतील अविश्वास प्रस्तावावर काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती. सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मात्र, मोदी सरकारच्या थेट विरोधात न जाता मतदानापासून दूर राहण्याचा मध्यममार्ग शिवसेनेने स्वीकारला आहे.

लोकसभेत शिवसेनेचे सध्या १८ खासदार आहेत. या खासदारांनी मोदी सरकारच्या बाजूने मतदान केले असते. तर सरकारची बाजू भक्कम झाली असती. मात्र, शिवसेनेने मतदान न करण्याचा निर्णय घेऊन भाजपला  इशारा दिल्याचे बोलले जात आहे.