अंमळनेरमध्ये धरणग्रस्तांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

0
392

जळगाव, दि. १९ (पीसीबी) – जळगावमधील अंमळनेर येथे प्रचारसभा घेण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी (दि. १८) धरणग्रस्तांच्या रोषाचा सामना करावा लागला. धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. या प्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे.