आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; चेन्नई-बंगळुरू पहिला सामना रंगणार  

0
853

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – आयपीएलच्या बाराव्या हंगामाला येत्या २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील सामन्यांचे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक आज (मंगळवार) जाहीर करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्याचा विचार सुरु होता.  मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये पहिला सामना रंगणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.