दापोडीत महिलेला मारहाण करुन विनयभंग

0
748

दापोडी, दि. १९ (पीसीबी) – झाडू फेकून मारल्याचा जाब विचारत दोघाजणांनी एका महिलेस शिवीगाळ करुन जबर मारहाण करुन विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि.१८) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर दापोडी येथे घडली.  

याप्रकरणी पिडित ३५ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर चलवारे आणि शालन चलवारे (दोघेही रा. जयभीमनगर, दापोडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिडित महिला या त्याच्या घराजवळ कपडे दुहत होत्या. यावेळी आरोपी शंकर दारु पिऊन आला आणि त्याने महिलेला झाडुने मारल्याचा जाब विचारला. या दरम्यान शालन देखील तेथे पोहचल्या या दोघांनी महिलेला शिवीगाळ करत जबर मारहाण करुन विनयभंग केला. याप्रकरणी शंकर आणि शालन या दोघांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.