मुख्यमंत्री भावासारखे, पण भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावेच लागते – संजय काकडे

0
931

पुणे, दि. ११ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला भावासारखे आहेत. पण भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावेच लागते, अशा शब्दांत  भाजपचे सहयोगी सदस्य व  राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.

काकडे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने इतर नेत्यांच्या  नावांवर विचार सुरू केला आहे. त्यामुळे काकडे यांनी  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक वाढविण्यास सुरूवात केली आहे. आज  (सोमवार) पुण्यात  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर काकडे पत्रकारांशी बोलत होते.

काकडे म्हणाले की, काही सोंगाड्यांमुळे भाजपमध्ये कोंडी झाली आहे. भाजप आता खासदारकीसाठी कोणतीही नावे पुढे करत आहेत. जे स्वतःच्या बळावर नगरसेवक होऊ शकत नाहीत. त्यांना खासदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. मुख्यमंत्री फडवणीस यांच्याविषयी माझ्या भावना  चांगल्या असून ते मला भावासारखे आहेत.  मात्र, भाजपने माझा वापर करून घेतला, असा आरोप काकडे यांनी यावेळी केला.