चुरशीच्या टी-२० सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव; न्यूझीलंडने मालिका २-१ने जिंकली

0
865

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – हेमिल्टन येथील न्यूझीलंडने भारताचा तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या चार धावांनी पराभव  करून मालिका खिशात घातली. तीन सामन्यांची मालिका २-१ अशी किवींनी जिंकली. चुरशीच्या झालेल्या  अंतिम सामन्यात न्यूझीलंडने २० षटकांत ४ गडी बाद २१२ धावा केल्या.  या आव्हानात्मक धावसंख्येचा  पाठलाग करताना भारताला ६ गडी बाद २०८ पर्यंतचा मजल मारता आली.   

हेमिल्टन येथे रंगलेली ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने जिंकली होती. पण टी-२० मध्ये विजय कायम राखण्यात  भारताला यश आले नाही. टी-२०च्या तीन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विजयी झाला होता. दुसरा सामना जिंकून भारताने बरोबरी साधली होती. परंतू  अंतिम सामन्यात भारताला चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

भारताला पहिला धक्का पहिल्याच षटकात बसला. मिशेलच्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूत शिखर धवन झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने डाव सावरला आणि त्याला विजय शंकरने साथ दिली. दोघांनी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र तरीही ते भारताला विजयापर्यंत नेऊ शकलेले नाहीत.  भारतीय गोलंदाजांपैकी कुलदीप यादवने दोन गडी बाद करत २६ धावा दिल्या तर भुवनेश्वर कुमार आणि खलील यांना प्रत्येकी एक बळी घेतला.