डॉ. मिलिंद चिंतळे यांच्या हिल अँड ट्रेकिंग कंपनीमार्फत ६० पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास हे पर्यटक नेपाळ-चीन सीमेवरील कस्टम आणि इमिग्रेशन इमारतीजवळ पोहोचले होते.
त्याचवेळी परिसरात महापूर आणि मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने डोंगराचा मोठा भाग, चिखल, माती आणि दगडांचा प्रचंड ढिगारा संबंधित इमारतीवर कोसळला. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली असून पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

