मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला एसईबीसी या विशेष प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच याबाबत न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ओबीसी फेडरेशनच्या नेत्यांनी आज (सोमवार) येथे सांगितले. यामुळे मराठा आरक्षण वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.