उर्जित पटेलांना स्वाभिमान असेल, तर त्यांनी मोदींना जागा दाखवावी – राहुल गांधी

0
502

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला स्वाभिमान जागा असेल, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची जागा दाखवावी, असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांनी दिले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज (सोमवार) मुंबईतील मुख्यालयात सर्वसाधारण सभा  होत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व स्वायत्त संस्थांना उध्वस्त करण्याचे काम मोदी करत करत असल्याचा आरोपही राहुल यांनी यावेळी केला. 

आरबीआय आणि सरकारचे संबंध बिघडले आहेत. त्यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थ मंत्रालयाने इतिहासात कधीही झाली नाही अशी कृती आरबीआयसोबत केली. आरबीआय कायद्यातील कलम ७चा वापर सरकारने बँकेवर केला. यामुळे आरबीआय जरी स्वायत्त असली, तरी सरकारला गव्हर्नरांना थेट आदेश देता येऊ शकतो.

दरम्यान, उर्जित पटेल यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन सरकार आणि आरबीआयमध्ये सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबईत आरबीआयची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेमध्ये या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.