दि. १२(पीसीबी) -मुंबई हायकोर्टाला आज, 2 वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्ट रिकामे करण्यात आले असून तापसणी सुरु आहे. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक हायकोर्टात तातडीने दाखल झाले आहे. हायकोर्टातील वकील, न्यायाधीशांचे सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामे करण्यात आले आहेत. हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती.
मुंबई हायकोर्टासोबतच दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही हायकोर्ट खाली करण्यात आले आहेत. आज, 2 वाजताच्या सुमारास हे बॉम्ब स्फोट होणार असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे.
हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या मेलमध्ये ‘बॉम्ब स्फोटांसाटी शुक्रवार पवित्र, त्यासाठी पाकिस्तान-तामिळनाडू यांची मिलीभगत… जज रुम, कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत खाली करा…‘ असे म्हटले आहे.मुंबई हायकोर्टातून सर्व न्यायाधीश आणि कोर्ट स्टाफ यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. हायकोर्टाची संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. बॉम्ब स्कॉड पथकही दाखल झाले आहे. पोलीस सर्व माहिती घेत आहेत. ज्यावेळी धमकी मिळाली तेव्हा पोलीसांनी सर्व कोर्ट रूममध्ये स्टे अलर्टचा मेसेज दिला. त्या नंतर सर्व इमारत खाली करण्यास सुरवात केली