आता इंदिरा गांधी जिवंत असत्या, तर मी काँग्रेसमध्ये असतो – शत्रुघ्न सिन्हा

0
624

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – आज जर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जिवंत असत्या, तर मी काँग्रेसमध्ये असतो, असे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. मात्र, आपण पक्ष सोडणार नसून, पक्षाने हवे असेल तर आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवावा, असेही  त्यांनी म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांना तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकला. असे विचारले असता ते म्हणाले की,   नरेंद्र मोदी यांची ऊर्जा आपल्याला प्रेरणा देते. आपल्या ग्रंथांमध्ये रावणासहित सर्वांकडून शिकले पाहिजे, अशी शिकवण देण्यात आली आहे, असे सांगून त्यांनी पक्षासोबत आपले संबंध थोडे कटू असल्याची कबुली दिली.

अटलजींच्या कार्यकाळात आपण लोकशाही कार्यकाळाचा आनंद घेतला. पण  सध्या हुकूमशाही  आहे.  कोणतीही माहिती न देता नोटाबंदीसारखे निर्णय घेतले जातात. रात्री हे निर्णय जाहीर केले जातात,  अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदीवर केली. सरकारने तपास यंत्रणेला संपवले आहे. हे सीबीआय अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून, राफेलसारखे काहीतरी झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे,  असेही ते म्हणाले.