‘थेरगाव सोशल फाउंडेशन’ने ऑईल गळतीमुळे निसरडा झालेला रस्ता केला स्वच्छ

0
1161

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) थेरगांवातील डांगे चौक बसस्टॉप ते बिर्ला हॉस्पिटल रस्त्यावर पीएमपी बसमधून अचानक ऑईल गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑईल रस्त्यावरून पसरून रस्ता निसरडा झाला. यामुळे अनेक दूचाकीस्वारांचा घसरून अपघात झाला. यानंतर “थेरगाव सोशल फाउंडेशन” च्या सदस्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली.

अग्निशमक दलाची २ वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यापूर्वी उपाययोजना म्हणुन फ़ाउंडेशन मेंबर्स व बस चालक, वाहक यांच्या मदतीने बस बाजुला घेवुन सांडलेल्या ऑईलवर माती टाकली व वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली.

त्यामुळे संभाव्य अपघात रोखले. त्यानंतर रस्ता पूर्णपणे स्वच्छ करुन घेतला आणि वाहतूकीसाठी पूर्ववत  करण्यात आला. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी याच मार्गावर ऑईल गळती झाल्यामुळे रस्ता निसरडा झाला होता.