नवीन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल – प्रा.प्रशांत साठे

0
22
  • निगडीत शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात

निगडी प्राधिकरण दि.१० (पीसीबी) –

नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर सोबतच स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याची प्रेरणा मिळणार आहे. मुलांना अतिशय उत्तम शिक्षण मिळावे या हेतूने केंद्र सरकारसह अनेक शैक्षणिक तज्ञ प्रयत्न करीत असल्याचे मत प्रा.प्रशांत साठे यांनी मांडले.
निगडी येथील कॅप्टन कदम सभागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे आयोजित शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठावर पद्मश्री, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे तसेच अभाविप राष्ट्रीय कार्यकारी परिषद विशेष निमंत्रित सदस्य प्रा.प्रशांत साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक व परिचय सचिन राऊत यांनी केला.
पुढे बोलतांना साठे यांनी
परकीय गुलामीतून बाहेर पडण्यासाठी स्वबोध, स्वभाषा, स्व संस्कृती, स्व धर्म, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्व मंत्र अंमलात गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी एकात्म मानव दर्शन विषयावर प्रकाश टाकला. राज्यातील व देशातील शिक्षण क्षेत्रातील बदल, येणाऱ्या पिढी पुढे राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक विषय कसे मांडावे तसेच भाषा, इतिहास, भूगोल हे विषय कसे मांडावे हे सांगितले. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे आताच्या काळात काळात काठावर पास होणे हिंदू समाजाला परवडणारे नाही. समाजात जातीय विद्वेष सुरू असून हे थांबविण्यासाठी जातीय भेद मिटवून सकल हिंदूंनी एकत्र येत सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी राष्ट्रहितासाठी – हिंदुत्वासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन केले. गिरीश प्रभुणे यांनी समाजाची स्थिती सांगून प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण महत्वाचे आहे. सध्या हिंदुत्व टिकविण्यासाठी देशहितासाठी मतदान करण्याची गरज असल्याचे सांगितलेनवीन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल – प्रा.प्रशांत साठे

  • निगडीत शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात

निगडी प्राधिकरण दि.१० –

नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर सोबतच स्वतःच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याची प्रेरणा मिळणार आहे. मुलांना अतिशय उत्तम शिक्षण मिळावे या हेतूने केंद्र सरकारसह अनेक शैक्षणिक तज्ञ प्रयत्न करीत असल्याचे मत प्रा.प्रशांत साठे यांनी मांडले.
निगडी येथील कॅप्टन कदम सभागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे आयोजित शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठावर पद्मश्री, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे तसेच अभाविप राष्ट्रीय कार्यकारी परिषद विशेष निमंत्रित सदस्य प्रा.प्रशांत साठे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक व परिचय सचिन राऊत यांनी केला.
पुढे बोलतांना साठे यांनी
परकीय गुलामीतून बाहेर पडण्यासाठी स्वबोध, स्वभाषा, स्व संस्कृती, स्व धर्म, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्व मंत्र अंमलात गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी एकात्म मानव दर्शन विषयावर प्रकाश टाकला. राज्यातील व देशातील शिक्षण क्षेत्रातील बदल, येणाऱ्या पिढी पुढे राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक विषय कसे मांडावे तसेच भाषा, इतिहास, भूगोल हे विषय कसे मांडावे हे सांगितले. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे आताच्या काळात काळात काठावर पास होणे हिंदू समाजाला परवडणारे नाही. समाजात जातीय विद्वेष सुरू असून हे थांबविण्यासाठी जातीय भेद मिटवून सकल हिंदूंनी एकत्र येत सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी राष्ट्रहितासाठी – हिंदुत्वासाठी १००% मतदान करण्याचे आवाहन केले. गिरीश प्रभुणे यांनी समाजाची स्थिती सांगून प्रत्येकाच्या जीवनात शिक्षण महत्वाचे आहे. सध्या हिंदुत्व टिकविण्यासाठी देशहितासाठी मतदान करण्याची गरज असल्याचे सांगितले