सीआरपीएफ कॅम्प मध्ये अधिकारी असल्याचे सांगून दीड लाखांची फसवणूक

1 Min Read

चाकण, दि. २७ (पीसीबी) – सीआरपीएफ कॅम्प तळेगाव दाभाडे येथे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 22 ऑगस्ट रोजी चाकण येथे घडली.

दिनेश भटूसिंग जाधव (वय 42, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित कुमार, लोकेश कुमार कुमावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ते सीआरपीएफ कॅम्प तळेगाव दाभाडे येथे अधिकारी असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादीकडून एक लाख 53 हजार रुपये घेतले. ते पैसे परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article