महाराष्ट्र शासनाचा २०२६ चा ‘वाचन प्रेरणा सन्मान’ हा पुरस्कार डॉ. निलाक्षी काळे-सालके यांना प्रदान कऱण्या आला आहे.

PCB Admin
1 Min Read

‘मातृगंध’ फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठी भाषा जपणं आणि नवी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे.
त्यांना अलीकडेच युनायटेड अमेरिकन विद्यापीठाकडून सामाजिक सेवा क्षेत्रातील ‘मानद डॉक्टरेट’ पदवीनेही सन्मानित करण्यात आले आहे.

  • ‘मातृगंध’ फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत १३५० हून अधिक वाचनसत्रे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत.
  • नवीन पिढीला तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषेची गोडी लावण्याचे मोठे काम या संस्थेने केले आहे.
    डॉ. नीलाक्षी काळे-साळके या पिंपळे गुरव (पुणे) येथील रहिवासी असून, त्या आयटी (IT) क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील आपली व्यस्त नोकरी सांभाळत त्यांनी मराठी भाषा संवर्धन आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
Share This Article