गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधाननमो सेवा गाथा चे सादरीकरण उत्तमआमदार प्रसाद लाड

PCB Admin
2 Min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान हा 25 वर्षाचा कार्यकाल नमो सेवा गाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून चलचित्र आणि अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या सहाय्याने 30 मिनिटांच्या अत्यंत आकर्षक अशा कलाकृतीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. 12 कलाकार आणि पंचवीस वर्षाची कारकीर्द याचा अत्यंत परफेक्ट समतोल साधला गेला आणि एक जिवंत कलाकृती अत्यंत मंत्रमुग्धपणे उपस्थित प्रेक्षकांनी अनुभवली.

शनिवार दिनांक 17 नोव्हेंबर 2026 रोजी ग दि माडगूळकर सभागृह प्राधिकरण या ठिकाणी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास पदवीधर आणि शिक्षक निवडणूक प्रभारी विधानपरिषद आमदार प्रसादजी लाड साहेब, या कार्यक्रमाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सहसंयोजक विधान परिषद आमदार अमित जी गोरखे, भाजप जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप महाराष्ट्र विधान परिषद आमदार उमाताई खापरे माजी आमदार अश्विनीताई जगताप, माझी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे मधुकर बच्चे वैशाली खाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनेश यादव माझी उपमापूर शैलाजाताई मोरे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, सौ माधुरी शिंदे , त्याचबरोबर कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका गौरी लोंढे मॅडम सर्व सहभागी कलाकार यांच्यासह अनेक नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमो सेवा गाथा या कार्यक्रमाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संयोजक राजाभाऊ दुर्गे यांनी केले प्रास्ताविक आमदार अमित घोडके यांनी केले.

आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रसादजी लाड यांनी या कलाकृतीचे तोंड भरून कौतुक केले. अत्यंत कमी वेळेमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलेली ही कलाकृती संपूर्ण महाराष्ट्रात दाखवली जावी अशा पद्धतीचे नियोजन पक्षातर्फे भविष्यात करण्यात यावे, अशी विनंती मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश आणि केंद्राकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले ज्या 2014 साली नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्या 2014 साली जन्माला आलेल्या मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची कारकीर्द कशी काय माहीत असणार ? ती संपुर्ण कारकीर्द या कलाकृतीच्या माध्यमातून त्या मुलांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे. असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक अमितची गोरखे, आमदार शंकर जगताप, जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक राजाभाऊ दुर्गे, कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका गौरी लोंढे आणि कार्यक्रमाचे सर्व कलाकार यां सर्वांचे तोंड भरून कौतुक करुन अभिनंदन केले आणि आभार देखील मानले.

Share This Article