ग्राहक बनून आलेल्या महिलेने ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने पळवले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या एका महिलेने दागिने पाहत असताना हात चलाखीने दागिने पळवले. ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास लांडेवाडी रोड भोसरी येथील भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स या दुकानात घडली.

या प्रकरणी 21 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्राहक बनून आलेल्या महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स या दुकानात काम करतात. शनिवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास दोन महिला दुकानात ग्राहक बनून आल्या. त्या महिलांनी कानातील टॉप्स बघण्याच्या बहाण्याने ते हातात घेतले. एकूण सहा टॉप्स हातात घेऊन पाहत असताना एका महिलेने 66 हजार रुपये किमतीचा एक जोडी कानातील टॉप्स हाताच्या अंगठ्या खाली लपवून फिर्यादी यांना कळू न देता फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article