संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
615
  • भाजपा आणि राष्ट्रवादी मध्ये श्रेयवाद उफाळला

पिंपरी दि. 5 (पीसीबी) – साई चौक जगताप डेअरी येथील छत्रपती संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षसंजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, महापालिकेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उद्घाटनाचे नियोजन केले होते, पण तत्पूर्वीच राष्ट्रवादीने फित कापून, गुलाल उधळून सोहळा उरकल्याने श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. 

आज ( दि. 5 ) प्रभाग 28 रहाटणी – पिंपळे सदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते फीत कापून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला .

यावेळी नगरसेवक मयुर कलाटे नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे, सागर कोकणे,उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक नाना काटे वा नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटर चे काम पूर्ण करण्यात आले.या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे .विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .