0
656

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी)  : आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती सध्या ठिक असून गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. मला कोरोना झाला असला तरी आरबीआयमधील काम सामान्य मार्गाने सुरू राहील.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मला कोविड -19 ची लागण झाली आहे. मला कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. माझी तब्बेत आता ठिक आहे. माझ्याक संपर्कातील लोकांनी काळजी घ्यावी. आयसोलेशनमध्ये राहुन मी काम करणार आहे. आरबीआयमधील काम सामान्य पद्धतीने सुरू राहील. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार आहे”

कोरोनाविरोधातील लढाईत भारताने आणखी एक यश मिळवलं आहे. देशात रोज नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची रिकव्हरी रेट 90 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासात 50,129 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 62,077 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले. देशात सध्या 6 लाख 68 हजार 154 अॅक्टिव रुग्ण आहेत. संपूर्ण कोरोना बाधित संख्येचे तुलनेत हे प्रमाण 8.50 टक्के आहे तर आतापर्यंत 70 लाख 78 हजार 123 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सक्रिय आणि बरे झालेल्या केसेसमधील दरी सतत वाढत आहे. देशात सक्रिय आणि बरे झालेल्या रूग्णांमधील फरक 64 लाखांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सांगण्यात आले की, गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या एक हजाराहून कमी झाली आहे, तर 2 ऑक्टोबरपासून ही संख्या 1100 पेक्षा कमी राहिली आहे.