3 सदस्यीय प्रभाग रचनेचा अध्यादेश राज्यपालांकडे

0
543

पुणे, दि. २ (पीसीबी) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 सदस्यी प्रभाग रचनेचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, 3 सदस्यीय प्रभाग रचनेच्या विरोधात राहिलेली काँग्रेस अद्यापही 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर अडून असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारनं महापालिका निवडणुकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा विचार करावा असं म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाण आज पुण्यात बोलत होते.

महापालिका निवडणुकीसाठी 2 किंवा 4 चा प्रभाग असावा ही माझी वैयक्तीक भूमिका आहे. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीत दोनचा प्रभाग असावा असा ठराव ढाला. राज्यात माहाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे तडजोडीसाठी तीनचा प्रभाग केला असावा. असं असलं तरी महापालिका निवडणुकीत दोनचा प्रभाग करण्यासंदर्भात विचार कारावा, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ज्यावेळी काँग्रेसनं एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता. तेव्हा मी बोललो की 2 किवां 4 चा प्रभाग करा. कारण चारचा प्रभाग असेल तर दोन महिला आणि दोन पुरुषांना संधी मिळू शकते. मात्र, पक्षानं भूमिका घेतली आहे. ती चूक आपणच केलेली आपण दुरुस्त करतोय. काहींनी मान्य केलं मात्र काही जणांनी तडजोड करण्यासाठी तीनचा प्रभाग केला, असं गडकरी म्हणाले.

भाजप नेत्यांकडून मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी तसे संकेत दिले होते. त्याबाबत बोलताना त्यांनी अपेक्षा करत राहणं. याशिवाय त्यांना दुसरं काही करता येणार नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. मध्यावधी निवडणुकांची गरज नाही. केवळ आशावादावर वक्तव्य करणं त्यांनी करत राहावं, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावलाय.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला निर्णय कायम असणार आहे. कारण, तसा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.

काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा ठराव
मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे