शिवेसेनेत मोठा भूकंप, अनिल परब यांची कुंडली सोमय्या यांना देणारा नेताही शिवेसेनेचाच

0
263

मुंबई, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेत भूकंप होईल अशा चार ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाल्या आहेत. मंत्री अनिल परबांच्याविरोधातील सर्व मटेरीयल हे माजी मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक नेत्यानं केला आहे. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतंय. दरम्यान, कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपल्या विरोधातील हे एक षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी मीडियाशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले होते. रत्नागिरी परिषदेतील खेडचे क वर्ग नगरपालिकेतील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुष्कळशी प्रकरणं मी माहितीच्या अधिकारातून काढली. आमच्या नऊ नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रस्तावाची शहानिशा केली, सुनावणी घेतली आणि हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. खेडेकर हे कोर्टात गेले होते. न्यायालयामधून त्यांनी चार आठवड्याची स्थिगिती घेतली. त्यानंतर ते प्रचंड बिथरले. त्यांनी माझ्यावर निखालस खोटे, चुकीचे आणि दिशाभूल करणारे आरोप केले, असा दावा कदम यांनी केला होता.

शिवेसनेत मोठी गटबाजी असल्याचे यापूर्वी वारंवार बोलले गेले आता ते अगदी स्पष्ट झाले. परब आणि कदम यांच्यातील वितुष्ट ऑडिओ क्लीपमधील संवादातून दिसते. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवेसनेचे माजी मंत्रीअनिल परब यांच्याशी एकाच वेळी संवाद असणाऱा कर्वे या कार्यकर्त्याबरोबरचा हा संवाद आहे. कर्वे हा मनसेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप कदम यांनी केला असून ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नाही, असे म्हटले आहे. परब आणि कदम कुटुंबाचे गेली अनेक वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असेही कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.